पदोन्नतीतील प्रतिनिधित्व, सरकारचे आरक्षणविरोधी धोरण, पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा ७ मे २०२१ चा आदेश रद्द करावा, सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, बहुजनविरोधी कामगार कायद्याचा निषेध, भारत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरण, शेतकरी कामगार कर्मचारीविरोधी कायदे रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये होणारे शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा, कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन लागू करा या व इतर मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात नगरपरिषद कार्यालयासमोर झाली. घोषणा देऊन बोंबाबोंब आंदोलन केले गेले. किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे यांनी यावेळी मनाेगत व्यक्त केले. प्रोटान तालुकाध्यक्ष डी. ए. सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले. नंतर मोटरसायकल रॅली तहसील कचेरीपर्यंत काढण्यात आली. या परिसरातील उपभूमिअभिलेख कार्यालय, गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, सहायक दुय्यम निबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय आणि शेवटी तहसील कार्यालयांच्या समोर कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले.
याप्रसंगी प्रोटान जिल्हा महासचिव मिलिंद निकम यांनी आंदोलनाची माहिती दिली. रणजित शिंदे मागास कृती समिती, अविनाश खैरनार, जितेश सदाशिव तालुकाध्यक्ष यांची यावेळी भाषणे झाली. भाषणानंतर तहसीलदार साहेब यांना मुख्यमंत्र्यांना द्यावयाचे निवेदन सर्वांनी मिळून दिले. निवेदनावर अजय भामरे, कमलाकर सदाशिव, राजेश मोरे, विश्वासराव पाटील, नूरखान पठाण, अतिश बिऱ्हाडे, सोपान भवरे, दिनेश मोरे, विलास चौधरी, समाधान मैराळे, अशोक सोनवणे, रवींद्र पाटील, गणेश शिंगारे, सुनील मोरे, गणेश चव्हाण, अजय गव्हाणे, बाळासाहेब सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.