-सुशील देवकरजळगाव: शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा विषय भाजपासाठी ‘गले की हड्डी’ बनला आहे. भाजपाचे पॉवरफुल नेते व केंद्री रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याच खात्याचा हा विषय असताना व त्यांनीच याबाबत वारंवार आश्वासन दिलेले असतानाही गेल्या काही वर्षांपासून डीपीआर मंजुरीच्या प्रक्रियेबाबत सातत्याने सुरू घोळ सुरूच आहे. एकतर भाजपाचे नेते केवळ पोकळ आश्वासने देत असून त्यांना हे काम प्रत्यक्षात करावयाचे नाही किंवा ‘नही’च्या अधिकाºयांपुढे त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांचेही चालत नाही, असेच चित्र यातून दिसून येत आहे.यापूर्वी मनपात भाजपाची सत्ता नसल्याने व समांतर रस्त्यांचा विषय हा शहराचा जिव्हाळयाचा विषय असल्याने राज्यात व केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाकडून हेतुपुरस्करपणे हे काम रखडवले जात असल्याचा आरोप होत होता. मात्र आता मनपातही भाजपाची सत्ता आल्यानंतर तरी जळगावकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हा विषय भाजपाचे आमदार, खासदार, मंत्री तातडीने मार्गी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता लोकसभा निवडणुक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाही हा प्रश्न तातडीने निकाली काढणे भाजपाला जमलेले नाही. गडकरी यांनी याबाबत आश्वासन देऊनही ते तातडीने हा विषय मात्र मार्गी लावू शकलेले नाही. ‘नही’चे अधिकारी या समांतर रस्त्याचा डीपीआर त्यांच्या नियम, निकषांवर तपासून तरी मार्गी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यात सातत्याने घोळ घालणेच सुरू आहे. त्यामुळे ‘नही’चे अधिकारी भाजपाच्या मंत्र्यांनाही जुमानत नसल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. त्यातच ‘नही’कडून सुरू असलेला एककल्ली कारभार यामुळे जनमानसात विनाकारण असंतोष पसरत आहे. ‘नही’ने लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतलेले नसल्याने लोकप्रतिनिधींकडूनही श्रेय घेण्याच्या नादात चुकीची माहिती पसरविली जात आहे.आर्थिक अडचणीचे कारणही शक्यमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही शासनाने ७०:३० या हिस्सेदारीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कामांना शासनाने आर्थिक अडचणीमुळे मोबीलायझेशन अॅडव्हान्सदेखील मक्तेदारांना दिलेला नाही. तरीही मक्तेदाराने घरातून पैसे टाकून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात केली. मात्र नीरव मोदी प्रकरणामुळे बँका या मक्तेदारांना या कामासाठी कर्जही द्यायला तयार नाहीत. त्यामुळे या कामांची कोंडी झाली आहे. तरसोद ते फागणे टप्प्याचे काम याच कारणामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले आहे. तर दुसºया टप्प्याचेही काम याच मार्गावर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मोठमोठ्या घोषणा करणाºया भाजपा नेत्यांची त्यामुळे पंचाईत झाली आहे.