शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

खान्देशच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण अधोरेखित करणारे पुस्तक ‘दालगंडोरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:17 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात साहित्यिक अशोक कोतवाल लिखित ‘दाल गंडोरी’ या पुस्तकाचा रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला थोडक्यात परिचय.

मराठीत स्त्रियांना स्वयंपाकात मार्गदर्शन करणारी काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. परंतु जळगाव येथील साहित्यिक अशोक कोतवाल लिखित ‘दालगंडोरी’ या पुस्तकात खान्देशातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थांबद्दल, त्यांच्या चवीबद्दल, त्यांच्या आस्वादाबद्दल लिखाण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्वादाचा अनुभवच येथे शब्दरूपाने अनुभवायला मिळतो. एक वैशिष्ट्य म्हणजे खान्देशातील आगळ्या-वेगळ्या पदार्थांची कृतीही त्यांनी सविस्तर सांगितली आहे. म्हणजे कोणते पदार्थ किती घ्यावेत, ते कसे भाजावेत, पुढे काय करावे हे त्यांनी इतक्या सविस्तरपणे सांगितले की, लेखकाच्या हातचे किंवा त्यांच्या सल्ल्याने हे पदार्थ आपण खाल्लेच पाहिजेत, अशी तीव्र भावना होते. येथे ते त्या पदार्थांच्या स्वादाचे निराळेपण सांगतातच, परंतु संपूर्ण कृतीही (रेसीपी) सांगतात. पदार्थांची चव, त्यांचे अनोखेपण, त्याचे दिसणे, त्याचा गंध, त्याचा स्पर्श अशा विविध अंगांनी तो पदार्थ आपल्या अनुभवाचा विषय होऊन जातो. पुस्तकाच्या प्रारंभीच लेखक म्हणतो की, आपले आयुष्य खाण्यामध्ये तर संपणार नाही ना? या मिष्कील वाक्यापासून सुरू होणारे हे मुक्त गद्य पदार्थांच्या रस, रंग-गंधासह प्रत्यक्ष चवीचा अनुभव देते. प्रत्येक पदार्थाची सामग्री आणि कृतीही सविस्तरपणे दिली आहे. तीही ललित भाषेत वर्णन केली आहे. तांत्रिक भाषेत नाही. खान्देशातील काही पदार्थ फक्त खान्देशातच तयार होणारे आणि त्या मागे काही कहाण्याही आहेत. उदा. फौजदारी डाळ अशीच अपघाताने तयार झालेली आणि पुढे लोकप्रिय झालेली. रस्त्याने येणारा जाणारा एक फौजदार एका घरात शिरतो आणि कोंबडी करण्याची आज्ञा देतो. घरातील पुरुष मंडळी कोंबडी आणायला जातात. कोंबडी मिळत नाही. तेव्हा घरातील बायकांनी आपली प्रतिभा वापरून काही डाळी एकत्र करून डाळ केली. फौजदार तृप्त झाला आणि तेव्हापासून ‘फौजदारी डाळ’ असे नामाभिधान प्राप्त केलेली डाळ अतिशय लोकप्रिय झाली. याशिवाय ‘सातपुडी पाटोड्या’ खाऊन दरोडेखोर कसा तृप्त होतो व दरवर्षी पाटोड्याची खंडणी कशी वसूल करतो याची हकीकतही लेखकाने रंजकपणे मांडली आहे. थोडक्यात, ग्रामीण भागातील मनोविश्वावर प्रकाशझोत टाकणारे ‘दालगंडोरी’ हे पुस्तक महिलावर्गासोबत सर्वांना आपलेसे करेल, असे वाटते.लेखक : अशोक कोतवाल, पृष्ठे : ९८, मूल्य २०० रुपये