जीवनसंध्या माणसाचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य अर्थपूर्ण व्हावे, आजवर वेचलेले साहित्य हे इतरांना मोती वाटावेत म्हणून झालेल्या अनुभवाचे वाटेकरू इतरांनाही करून घ्यावे, उपदेश, संस्कार सिंचन करावे या प्रेरणेतून धुळे येथील प्रा. आबा नथ्थू पाटकरी यांनी ‘जीवनसंध्या’ ही साहित्यकृती साकारली आहे. वृद्धत्वाचा सकारात्मक विचार करणे आणि तो वयोज्येष्ठात रुजविणे या भूमिकेतून त्यांच्या लेखणीतून ‘जीवनसंध्या’ रेखाटली आहे. यात 25 लेखांचा समावेश आहे. माणसाने जगावे किती व का, जीवनाची सार्थकता, जगण्याची कला, निवृत्त होऊ नका अशी काही या ग्रंथातील लेखांची शीर्षकं बोलकी आहेत. आयुष्याच्या उतरणीतील यशस्वी वाटचाल, समाधानी वृद्धत्वासाठी ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी, वृद्धांची काळजी, समस्या व समाधान ही या ग्रंथातील लेखांची शीर्षकं ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धत्व सुसह्य करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे आहेत. लेखक : प्रा.आ.न.पाटकरी, पृष्ठे : 32, मूल्य 60 रुपये अहिराणीतील पहिली अनुवादित कादंबरी : अमिना सर्व देशांमध्ये पुरुषप्रधान आणि पुरुषसत्ताक संस्कृती रुजलेल्या आहेत. धर्म कोणताही असो, स्त्री ही पुरुषाची गुलाम असून ती त्याची अंकीत असते, अशी वागणूक तिला दिली जाते. स्त्रियांना स्थान आणि मान मिळवून देण्यासाठी, त्यांना व्यक्तीस्वातंत्र मिळवून स्वावलंबी करण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळ फोफावली. आफ्रिका खंडातील नायजेरिया प्रदेशात घडलेल्या अशा कथेची वा्मयीन कृती ‘अमिना’ लिहिली गेली. मोहम्मद उमर या कादंबरीकाराने इंग्रजीतून ही कादंबरी लिहिली. या कादंबरीचे मराठीत भाषांतर उदय भिडे यांनी केले आहे. आता अहिराणी बोलीत ‘अमिना’चे भाषांतर पत्रकार सुखदेव वाघ यांनी केले आहे. भाषांतरामुळे मूळ कलाकृतीचे इंग्रजी- मराठी आणि अहिराणी रूपात येणारे दर्शन विश्वाला गवसणी घालणारे ठरते. ‘अमिना’ ही नायिकाप्रधान व स्त्रीवादी साहित्याचा एक उत्तम नमुना ठरते. ‘अमिना’ ही एका आमदाराची प}ी आहे. अल्हाजी हारून याची ती चौथी बायको आहे. तिला मिळालेल्या वागणुकीचा, गुलामीचा अनुभव मांडणारी ही साहित्यकृती आहे. लेखक : सुखदेव वाघ, प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स, पृष्ठे 286, मूल्य : 400 रुपये
बुक शेल्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 5:04 PM