अमळनेर : जळगाव च्या शनीपेठ हद्दीतील गोपालपुरा येथून अपहरण झालेला मुलगा व मुलगी जागरूक नागरिकामुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.२७ रोजी जळगाव येथील गोपालपुरा भागातून सुनील प्रताप बारेला रा चिरमल्या ता वरला जि बडवाणी याने शुभांगी राजू चव्हाण वय 10 वर्षे व मयूर रवींद्र बुनकर वय 9 वर्षे या दोघांना फूस लावून पळवून नेले होते. ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. शनीपेठ पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलीस देखील शोध घेत होते. १ रोजी सकाळी साडे सहा वाजता सुरेश पापाजी दाभोळे हे मारवड रस्त्यावर चिन्मय हॉटेल जवळून मारूतीच्या दर्शनाला जात असताना त्यांना लहान मुले व एक इसम पायी जात असताना दिसले त्यावेळी दया आल्याने मी तुम्हाला कुठे सोडू कुठे जायचे आहे असे विचारले असता सुनील ने मी काम शोधत आहे असे सांगितले. त्यावेळी सुरेश दाभोळे याने त्याला एका तबेल्यात कामासाठी नेले. दुपारी सुनील बारेला थोडा बाजूला जाताच ती लहान मुले रडू लागली आणि हे आमचे वडील नाहीत याने आम्हाला जलगवहून पळवून आणले आहे असे सांगितले असता दाभोळे याने तात्काळ हेडकॉन्स्टेबल जनार्दन पाटील यांच्याशी संपर्क साधून त्या तिघांना पोलीस स्टेशनला आणत असल्याचे सांगितले. पाटील यांनी सदरची घटना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या कानावर टाकून आरोपीला ताब्यात घेतले आणि शनीपेठ पोलिसांना कळवण्यात आले. शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे , गणेश गव्हाळे , कांबळे , विजय निकम तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे रवी नरवाडे , संजय हिवरकर , राजेश मेंढे , संदीप पाटील , प्रवीण मांडोळे , परेश महाजन , अशोक पाटील यांनी अमळनेर येऊन आरोपी सुनील बारेला याला ताब्यात घेऊन दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी जळगाव घेऊन दिले. सुरेश दाभोळे यांच्या सतर्कतेने अपहरण करणारा आरोपी सापडून मुले देखील मिळून आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
जळगावातील दोन्ही अपहृत मुले सापडली अमळनेरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 11:10 PM