या घटनेनंतर रविवारी पवन पाटील, अविनाश दांडगे, मंगेश सुभाष पाटील, नितीन विठ्ठल पाटील व सतीश पाटील या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली तर साजीद अब्दुल सालार व आमीर अब्दुल रज्जाक सालार या दोघांना अटक केली. प्रवीण प्रल्हाद कुंभार, नरेंद्र पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत.पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, रतिलाल पवार व गोविंदा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एकाला हृदयविकाराचा सौम्य झटका
करीम सालार यांचा मुलगा रेहान याला रविवारी दुपारी पोलीस ठाण्यातच हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्याला पोलिसांनी तातडीने मेहरुणमधील रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
असली नकली पिस्तूलचा खेळ
या वादाच्यावेळी एका गटाने पिस्तूल काढून धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही पिस्तूल बनावट व छऱ्याची होती, त्यामुळे दुसऱ्या गटाने खरीखुरी पिस्तूल काढून धाक दाखविला. दोन्ही गटाकडून फक्त धाक दाखविण्यात आला, मात्र फायरींग झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातही एका जणाकडे पिस्तूलचा परवाना होता, असेही सांगण्यात आले.