जळगाव : वर्डी, ता.चोपडा येथील योगराज भिका पाटील (४२) यांचा विष प्राशनाने मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.मिलिंद बारी यांच्या खबरीवरुन जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन शून्य क्रमांकाने अडावद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. कैलास देवीदास बोरोले (३५,रा.साळवा, ता.धरणगाव) यांचाही विष प्राशनाने मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्यू बुधवारी झाला. ही गुरुवारी धरणगाव पोलिसात वर्ग करण्यात आली आहे.
मनपाचे पाणी पुरवठ्याचे साहित्य लांबविले
जळगाव : मनपाच्या प्रभाग क्र. १४ मधील मनपाच्या मालकीच्या तलावानजीक पाणीपुरवठा पाईपलाईनचे मुरुम, खोदकामाचे मटेरियल व माती आदी आठ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले आहे. याबाबत मनपा कर्मचारी सागर बाळू नन्नवरे (रा.रामेश्वर कॉलनी) यांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मेहरुणमधून विवाहिता गायब
जळगाव : सुरत येथे जाते असे सांगून घराबाहेर पडलेली सुषमा शांताराम मोरे (४४,रा.मेहरुण) ही महिला १५ फेब्रुवारी रोजी गायब झालेली आहे. सुरत येथे नातेवाईकांकडे महिला न पोहचल्याने पतीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार संजय धनगर करीत आहे.
कॉलेजला गेलेली तरुणी बेपत्ता
जळगाव : जळगाव येथे कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षींय तरुणी नशिराबाद येथून १६ फेब्रुवारी रोजी सकाळी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी बुधवारी नशिराबाद पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.