जळगाव- मेहरूण तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. दरम्यान, तिसरा भाऊ अनस जकी अहमद हासुद्धा त्या ठिकाणी होता. त्याने आरडा-ओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोघांना पाण्यातून काढले. जळगावमधल्या अक्सानगर इथल्या अलअजीज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद उमेर जकी अहमद (वय-१२ वर्ष), अबुलैस जकी अहमद (वय-१६ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.
मेहरुण तलावात बुडून दोन्ही भावंडांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:36 PM