जळगाव : मनुदेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या ज्योती वसंत भोई (३२, रा.वरणगाव) या परिचारिकेचा गुरुवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. ज्योती हिला दोन तरुणांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र ते लगेच तेथून पळून गेल्याची माहिती ज्योती हिचा चुलत भाऊ गोविंदा पिंताबर भोई याने दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती ही गुरुवारी मनुदेवी, ता.यावल येथे दर्शनासाठी गेली होती. कोणासोबत गेली व कोणत्या वाहनाने गेली याची माहिती नातेवाईकांनाही उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती.या घटेबाबत दोन प्रकारच्या चर्चा होत्या. जिल्हा रुग्णालयात दुचाकी घसरुन डोक्याला मार लागला अशी एक तर दुसरी रिक्षातून पडून अपघात झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ज्यांनी दाखल केले ते तरुण कोण? व मृत ज्योती हिच्या चुलत भावाला बघून ते का पळून गेले असे प्रश्न उपस्थित होत असून भावानेही हा मृत्यू संशयास्पद असू शकतो, अशी शक्यता वर्तविली. दरम्यान, ज्योती हिचा घटस्फोट झालेला आहे. मोठा मुलगा पतीकडे तर लहान मुलगा ज्योतीकडे राहतो. आई, वडीलांच्या घराशेजारीच ज्योती दोन्ही मुलांसह वास्तव्याला होती. खासगी दवाखान्यात परिचारिकेचे काम करीत होते.
परिचारिकेला मृतावस्थेत टाकून दोघांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:30 PM
मनुदेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या ज्योती वसंत भोई (३२, रा.वरणगाव) या परिचारिकेचा गुरुवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. ज्योती हिला दोन तरुणांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र ते लगेच तेथून पळून गेल्याची माहिती ज्योती हिचा चुलत भाऊ गोविंदा पिंताबर भोई याने दिली.
ठळक मुद्देसंशयास्पद मृत्यू मनुदेवीला दर्शनासाठी गेली होती परिचारिकापलायन केलेले ‘ते’ दोघं कोण?