जळगाव : शहरातील गोरगरिब जेष्ठ नागरिकांना दोन वेळेची भूक भागविण्यासाठी बॉक्स आॅफ हेल्फ गु्रपतर्फे मोफत जेवणाचे डबे पूरविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे़ शनिवारी अनेक भागांमध्ये डबे पुरविण्यात आली असल्याची माहिती ग्रुपच्या संस्थापिका सुधा काबरा यांनी दिली़अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर भोजन मिळत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यासमोर हात पसरवीत असल्याचे समाजात दृष्य दिसते. या ज्येष्ठ नागरिकांचे सर्व दु:ख आपण दूर करू शकत नाही. मात्र त्यांना दोन वेळचे जेवण मोफत देवून त्यांची भोजनाची तृष्णा तर भागवू शकतो अशी संकल्पना समोर ठेवून बॉक्स आॅफ हेल्प ग्रुपतर्फे मोफ जेवणाचे डबे पुरविण्याचा उपक्रम सुरकण्यात आला आहे़ शुक्रवारी आणि शनिवारी अनेक जणांना घरपोच डबे ग्रुपच्या सदस्यांकडून पुरविण्यात आले़यावेळी ग्रुपच्या सुधा काबरा, कविता कराचीवाला, निता परमार, चित्रा मालपाणी, स्वाती सोमाणी, मनीषा तोतला, सुलभा लढ्ढा, मीनल लाठी, संगीता मंडोरा, सीमा जाखेटिया, संध्या मुंदडा, डॉ.हेंमागी कोल्हे, प्रमोद झांबरे आदींची उपस्थिती होती़
बॉक्स आॅफ हेल्फ ग्रुपतर्फे गरजू वृद्धांना जेवणाचे डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:51 PM