ममुराबाद शिवारातील घटना: जीएमसीत उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ममुराबाद शिवारातील एका शेतात राहणाऱ्या एका दहा वर्षीय मुलावर एका कुत्र्याने हल्ला करीत त्याच्या तोंडाचा लचका तोडल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. या मुलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भरत बालसिंग असे या मुलाचे नाव आहे. त्याचे कुटुंबीय शेतातच वास्तव्यास असून ते तेथेच काम करतात. सोमवारी दुपारी त्याचे वडील शेतात कामाला गेलेले असताना, तो अंगणात झोपलेला असताना अचानक कुत्र्याने येऊन त्याच्यावर हल्ला चढविला. यावेळी त्याच्या आईने या मुलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. त्याच्या ओठाजवळ मोठी जखम झाली असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळी ५ वाजता दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणी त्याला एआरएस इंजेक्शन देऊन दाखल करून घेण्यात आले आहे.