जळगाव : ब्राह्मण समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह विविध १३ मागण्यांचे ठराव शुक्रवारी जळगावात झालेल्या अखिल भारतीय ब्रह्म महाशिखर या संस्थेच्या गोलमेज परिषदेमध्ये ब्राम्हण समाजबांधवांतर्फे करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ब्राम्हण सभा येेथे झालेल्या एक दिवसीय गोलमेज परिषदेला राज्यभरातील ब्राम्हण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय ब्रह्म हाशिखर संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष निखील लातूरकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व भगवान श्री परशुरामांचे पुजनाने गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. व्यासपीठावर ब्राह्मण ज्ञाती संस्थांचे सु. द. पुराणिक, सुरेश मुळे, सचिन वाडे पाटील, गजानन जोशी, श्रीकांत कुळकर्णी, साकेत खोचे, सचिन नारळे, नितीन कुळकर्णी, अशोक साखरे, सुनिल याज्ञीक, अशोक वाघ, अशोक जोशी, वसंत देखणे, सचिन चौघुले, हेमंत वैद्य, ॲड. अश्विनी डोलारे, नितिन पारगावकर, आनंद दशपुत्रे, दिनकर जेऊरकर, व्ही. पी. कुळकर्णी, अजय डोहळे, रविंद्र जोशी, डॉ. नीलेश राव , स्वाती पातळे, ईश्वरी जोशी, स्वाती कुळकर्णी, रेखा कुळकर्णी, वृंदा भालेराव, मुग्धा दशरथी, ममता जोशी, रेवती लव्हेकर, रुपाली कुळकर्णी, अमला पाठक, वैशाली नाईक, निर्मला जोशी, पल्लवी उपासनी उपस्थित होते.
सुत्र संचालन श्रद्धा शुक्ल यांनी तर आभार प्रदर्शन भुपेश कुळकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी अनंत देसाई, हेमंत वैद्य, संग्राम जेऊरकर, संकेत तारे, निरंजन कुळकर्णी, भूषण मुळे, अविनाश जोशी, तेजस जोशी, राजेश कुळकर्णी, नीलेश कुलकर्णी, दीपक भट, प्रकाश मुळे, संतोष दप्तरी आदी समाज बांधवांनी परीश्रम घेतले..
इन्फो :
परिषदेत झालेले ठराव
पुरोहितांना मानधन मिळावे, वर्ग-२ इनामी जमिनी वर्ग १ करून खाजगी मालकीच्या करू देणे, महापुरूषांच्या बदनामी विरोधी कायदा करण्यात यावा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांंना भारतरत्न मिळावा, पुण्यातील दादोजी कोंडदेव व राम गणेश गणकरी यांचे पुतळे पुन्हा बसवावे, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे भव्य स्मारक उभारण्या यावे , जिल्हास्तरीय ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, जळगाव शहरामध्ये किंवा जळगाव शहरालगत भगवान श्री. परशूरामांच्या मंदिरासाठी जागा मिळावी, ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी व श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हावा, हे ठराव करण्यात आले.