जळगाव : तिसºया रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र,उर्वरित ठिकाणी भूसंपादनाचे कामच न झाल्यामुळे तिसºया लाईनच्या काम थांबले असल्याचे समोर आले आहे. सध्या याठिकाणी फक्त रेल्वेच्या हद्दीतच काम सुरु असून, भूसंपादना बाबत तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे २७ नोव्हेंबरला बैठक आहे.भुसावळ ते भादली या तिसºया रेल्वे लाईनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी जळगाव ते मनमाड दरम्यान तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलो मीटरच्या कामाला यंदा मे महिन्यात सुरुवात केली होती. सुरुवातीपासूनच हे काम युद्ध पातळीवर सुुरु केले होते. मात्र, या साडेअकरा किलो मीटरच्या मार्गावर ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी घेत आहेत. त्या शेतकºयांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली आहे.२७ नोव्हेंबरला मुख्य सचिवांकडे बैठकआधीच विलंब झालेल्या जळगाव ते मनमाड या तिसºया लाईनच्या कामाला पुन्हा भूसंपादनामुळे विलंब होत आहे. या संदर्भात रेल्वे अधिकाºयांनी रेल्वे मंत्रालयाला होणाºया विलंबाबाबत कळविल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे या संदर्भात २७ नोव्हेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी व भुसावळ विभागातील रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.
भूसंपादन न झाल्यामुळे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला ‘ब्रेक ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:16 PM