जळगाव - औरंगाबाद महामार्गावरील अंजिठा चौफुली दरम्यान असलेल्या पहूर पाचारो जंक्शनचे काम स्पँरोदारा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत सुरू आहे. या कंपनीने वाकोद ते नेरीदरम्यान रस्त्यावरील विद्युत पोल स्थलांतरासाठी वीज वितरण व खाजगी कंत्राटदाराकडे काम सोपविले आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गा अंतर्गत पहूर - पाचोरा रस्त्याच्या जंक्शनचे काम महिनाभरापूर्वी सुरू केले. पण, रस्त्याच्या कामात विद्युत पोल अडसर ठरत आहेत. त्यामुळे महिनाभरापासून कामाला संबंधित हायवे वीज वितरणचे अभियंता व संबंधित खाजगी कंत्राटदाराकडू ब्रेक लागल्याचे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सांगण्यात येत आहे. वीज वितरण कंपनी कामावर नियंत्रण ठेवून सुपरवायझिंग करणे, कामाचा दर्जा तपासणे व अंतिम काम झाल्यानंतर त्याची चौकशी करून वीज वितरण कंपनीकडे विद्युत पोल संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या कामात फक्त वेळकाढूपणा करून टोलवाटोलवी सुरू असल्याचे समोर आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या हजारो वाहनधारकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत.
प्रतिक्रिया
विद्युतपोल स्थलांतरासाठी वीज वितरण हायवे विभागाकडे पाठविलेला अहवाल प्रस्तावित आहे. व राष्ट्रीय महामार्ग जालना विभागाला अहवाल सादर केला आहे. आमच्याकडून काही अडचण नाही.
- श्रीनिवास,
प्रोजेक्ट सिनिअर व्यवस्थापक
स्पँरोदारा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी
वाकोद ते नेरीदरम्यान विद्युतपोल स्थलांतरासाठी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. विद्युतपोल स्थलांतराकरिता संबंधित कंपनीने खाजगी कंत्राटदाराला कामे सोपविली आहेत. त्यामुळे आमच्या स्तरावरून कोणतेही काम प्रलंबित नाही.
व्ही.डी. सोनवणे,
उपकार्यकारी अभियंता
उपविभाग
पहूर
फोटो ३०सीडीजे १
===Photopath===
290621\20210629_100012.jpg
===Caption===
औरंगाबाद -जळगाव अंतर्गत असलेल्या अजिंठा चौफुली वरील पहूर पाचोरा जंक्शन कामात अडसर ठरणारे विदूत पोल.बंद पडलेले काम