शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

३२ हजाराची घेतली लाच ; लाचखोर जिल्हा लेखापरीक्षकाला सुनावली सात आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 1:44 PM

जळगाव : लेखापरीक्षकाची छाननी करुन त्याचा चांगला अहवाल तयार करण्यासाठी ३२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब बाजीराव ...

जळगाव: लेखापरीक्षकाची छाननी करुन त्याचा चांगला अहवाल तयार करण्यासाठी ३२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब बाजीराव जंगले (५१,रा. गंगासागर अपार्टमेंट, रामानंदनगर) याला न्यायालयाने गुरुवारी सात आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जंगले याने बुधवारी सायंकाळी तीन प्रमाणित लेखा परीक्षकांकडून ३२ हजार रुपयांची लाच घेतली होती. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जंगले याला अटक केली. जंगले याने तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये, साक्षीदार यांच्याकडून दहा हजार रुपये, दुसरे साक्षीदार २० हजार रुपये व तिसरे साक्षीदार यांच्याकडून पंधरा हजार अशी एकूण ५२ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ५आॅगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता लाचेच्या मागणी रकमेपैकी ३२ हजार रुपये घेताना जंगलेला पंचांच्या समक्ष पकडण्यात आले.त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक (सुधारीत)कायदा सन २०१८चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, जंगले याला उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले.जंगले हा औरंगाबाद येथील मूळ रहिवासी आहे. त्यामुळे त्याच्या नावावर स्थावर व जंगम मालमत्ता तसेच बँक खात्याची माहिती मिळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.या गुन्ह्याचा तपास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जीएम ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव