लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दारू व्यवसायावर कारवाई करु नये, यासाठी २५०० रुपयांची लाच घेणारा पाळधी ता. धरणगाव येथील आऊट पोस्टचा पोलीस व होमगार्ड अशा दोघांना अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दूरक्षेत्राच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली.
पोलीस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (३७, रा.संत मीराबाई नगर, पिंप्राळा , जळगाव) व होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (रा.सोनवद, ता.धरणगाव) अशी या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार याच्यावर दाखल गुन्हयातील वॉरंटामध्ये त्यांना मदत करावी तसेच दारूविक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात सपकाळे याने २५०० रुपयांची लाच मागितली. ती सोनवणे याच्याकडे देण्यास सांगितले. सोनवणे याने बुधवारी ही रक्कम घेताच या दोघांना अटक करण्यात आली.