धुळे : महापालिकेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल यशवंत पगार यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांनी मंगळवारी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आह़े बिलाची फाईल मंजुरीसाठी बांधकाम ठेकेदाराकडे 12 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. वैभवनगर परिसरातील मोकळ्या जागेत वॉल कंपाऊंडचे बांधकाम या ठेकेदाराने केले होत़े काम पूर्ण झाल्यानंतर फाईलवर स्वाक्षरी करून पुढे मंजुरीसाठी पाठविण्याबाबत महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल यशवंत पगार यांनी त्या ठेकेदाराकडे लाच मागितली. त्यासाठी त्यांनी 10 जानेवारी रोजी मोबाइलवरून संपर्क केला होता. मोबाइल संभाषणाचे ते रेकॉर्डिगसह ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्या तक्रारीची शहानिशा उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांनी केली आणि मंगळवारी दुपारी पगार यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली़एसीबीची ‘मुहूर्त’बाधापगार 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. सेवेच्या शेवटच्या दिवशी त्यांच्याविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. या दुर्दैवी योगायोगासंदर्भात दिवसभर चर्चा सुरू होती.
सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘लाचखोरी’चे नारळ!
By admin | Published: February 01, 2017 12:43 AM