धरणगाव/एरंडोल, जि.जळगाव : बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या मुलीशी तेथील रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न केला. माझी दलालांनी फसवणूक केली असून, मला येथे राहायचेच नाही, असे तिचे म्हणणे आहे.बोरगाव, ता.धरणगाव येथील सुरेश यादव पाटील यांचा मुलगा रवींद्र याच्याशी संगीता (नाव बदलले आहे) तीन दिवसांपूर्वीच बोरगावच्या विठ्ठल मंदिरात लग्न झाले. सुशिक्षित असलेल्या संगीताचे खेडेगावात चित्त लागत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. राजू कोतले, निशांत पटुले, अंकुश पटुले यांनी मला येथे आणले होते व माझे लग्न लावून दिले. मला बोरगावला काही एक त्रास झालेला नाही. मात्र मला येथे राहायची इच्छा नसल्याने मी जाणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. दलालांनी वरपक्षाकडून घेतलेले ५० हजार रुपये मी माहेरला गेल्यावर पाठवून देईन, असेही ती सांगत आहे.शेतमजूर असलेल्या बोरगावच्या रवींद्र पाटील या गरीब कुटुंबातील युवकाने ५० हजार खर्चून आणलेली ही मुलगी घरातून गेली तर आपल्यावर काही घोडं उभं तर राहणार नाही ना, या ंिचंतत आहे. २७ रोजी रात्री आठला ही मुलगी नागपूर येथे जाण्यासाठी एरंडोल येथे आली होती. मात्र ग्रामस्थांनी तिला समजावून परत बोरगाव नेले. दि.२८ रोजी धरणगाव पोलिसांमार्फत नागपूर रवाना करणार असल्याची माहिती बोरगाव वार्ताहराने दिली. तालुक्यासह खान्देशात अशा अनेक मुली आणल्या गेल्या व त्यांनी काही दिवसातच पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत, अशीही चर्चा आहे.अतिशय गरीब असलेल्या कुटुंंबातील रवींद्र सुरेश पाटील नामक बोरगावच्या युवकाशी नागपूरच्या मुलीशी तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले. मात्र ती मुलगी बोरगावला सासरवाडीत राहायला तयार नाही. माझी फसवणूक झाल्याचे ती सांगत आहे. आज २७ रोजी ती नागपूरसाठी निघाली असता आम्ही तिला एरंडोलहून परत आणले. उद्या धरणगाव पोलिसांमार्फत तिला रितसर तिच्या माहेरी पाठवू. मात्र दोघां कुटुंंबांना फसविणाºया दलालांचा शोध लागला पाहिजे.- भालचंद्र पाटील, उपसरपंच, बोरगाव-लखीचंद पाटील, पोलीस पाटील, बोरगाव
नागपूरहून आणलेल्या नववधूचा लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच सासरमधून काढता पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:38 AM
बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या मुलीशी तेथील रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देदलालांनी माझी फसवणूक केली - नववधूखेडेगाव असलेल्या बोरगाव येथे चित्त लागत नसल्याची तक्रार