जळगाव : खासदार ए. टी. पाटील यांनी मंगळवार, १६ रोजी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेवून मतदार संघातील समस्यांवर चर्चा केली. मनपा हद्दीतील रस्त्यांसाठी वाढीव निधीची मागणी केली. त्यावर गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बांभोरी येथे पूल-कम-बंधारा मंजूर केला असल्याचे ए.टी. पाटील यांनी सांगितले. यामुळे वाहतूक आणि पाण्याच्या समस्येला आळा घालण्यास मदत होणार आहे.चाळीसगाव बायपास चौपदरीकरणाला मंजुरीधुळे—औरंगाबाद महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव बायपासपासून कन्नडकडे जाणाºया शहरांतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिली आहे. साडे चार किलोमीटर लांबीचा हा रस्ता सिमेंट—कॉंक्रीटने बनविला जाणार आहे. याच रस्त्यावरील पुर्णपात्रे रूग्णालयापासून ते घाट रोडपर्यंत तितूर नदीवर उड्डाणपूल बांधला जाणार आहे. तर मेहुणबारे येथे गिरणा नदीवर पुल कम बंधारा बांधला जाणार आहे. कन्नड बायपासपासून शहराकडे येणारा रेल्वे उड्डाणपूल या सर्व कामांचे एस्टिमेट पाठविण्याचे आदेश गडकरी यांनी क्षेत्रीय वाहतूक अधिकाºयाला दिले असल्याची माहितीही खासदार पाटील यांनी दिली. पिंप्राळा उड्डाणपुलाचे काम ‘सेतू भारतम’अंतर्गतमागील अनेक वर्षांपासून प्रलंबित पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सुध्दा मार्गी लावण्यात यश आले असून केंद्र सरकारच्या ह्यसेतू भारतमह्ण योजनेंतर्गत पिंप्राळा येथे उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली.
जळगावात राष्टÑीय महामार्गावर बांभोरी येथे पूल-कम-बंधारा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:55 PM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी केली चर्चा
ठळक मुद्देखासदार ए.टी. पाटील यांची माहितीपिंप्राळा उड्डाणपुलाचे काम ‘सेतू भारतम’अंतर्गतचाळीसगाव बायपास चौपदरीकरणाला मंजुरी