जळगाव : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने शहरातील विविध महाविद्यालये, शाळांमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नेताजींची वेशभूषा साकारून भाषणे केली. दुसरीकडे त्यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन आठवणींना उजाळा देण्यात आला.
ज्ञानसाधना विद्यालय (फोटो)
पिंप्राळ्यातील ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका छाया भोळे व राजश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी वैजयंती भोळे, धनराज भंगाळे, शुभांगी वारके, दीपमाला भोपे, राजेश तडवी, हिरालाल चौधरी, उदय नेमाडे आदींची उपस्थिती होती.
बहिणाबाई माध्यमिक विद्यालय
बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक टी. एस. चौधरी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक राम महाजन, प्रतिभा खडके, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, विलास नारखेडे, राजेश वाणी, संतोष पाटील, विशाल पाटील, दिनेश चौधरी, चंद्रकांत पाटील, पद्माकर चौधरी, शंकर चव्हाण, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदीश नेहते, नामदेव निकम आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद कार्यालय (फोटो)
नेताजी सुभाषचंद्र बोस व हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांच्यासह जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.
जिजामाता माध्यमिक विद्यालय (फोटो)
जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी प्रतिमा पूजन केले. विद्यार्थ्यांमधून रोहित भोई, ओम हटकर, आदित्य शार्दूल आदींनी भाषणे दिली. याप्रसंगी शिक्षक किशोर पाटील, संजय खैरनार, आशा पाटील, संगीता पाटील, विकास तायडे व शिक्षकेतर कर्मचारी संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा महाले तर आभार प्रदर्शन दिनेश सोनवणे यांनी केले.
प. वि. पाटील, ए. टी. झांबरे विद्यालय (फोटो)
प़ वि. पाटील व ए़ टी़ झांबरे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाश्वत कुलकर्णी, चैतन्य बडगुजर, पवन शिंपी या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याविषयी माहिती त्यांच्या भाषणातून दिली. त्यानंतर उपशिक्षक अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रोहिणी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पराग राणे यांनी मांडले. कार्यक्रमात दिलीप चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे आदी उपस्थित होते.