ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.6 - शहरापासून काही अंतरावर असलेल्या खेडय़ातील एका 25 वर्षीय विवाहितेने युवकाच्या छेडखानीला कंटाळून विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रय} केला.तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, सुदैवाने ती बचावली आहे.
एक युवक या विवाहितेची छेड काढत असल्याने तिने आत्महत्येचा प्रय} केला, असे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबातसांगितले. पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकाराने गावात मोठा संताप व्यक्त होत आहे. तरुणावर कारवाईची मागणी आहे.