जळगाव : खासगी रुग्णालयात दाखल एका बीएसएफ जवानाचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले. मात्र, कोणत्याच कोविड रुग्णालयात आयसीयूचे बेड शिल्लक नसल्याने मोठा जिकरीचा प्रश्न निर्माण झाला होता़ अखेर नगरसेवक राजेंद्र घुगे यांनी आमदार सुरेश भोळे यांना ही घटना सांगितली. यानंतर आमदार भोळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून त्या ठिकाणी तासाभरात बेड उपलब्ध करून देण्यात आला़ हा प्रकार सोमवारी सकाळी घडला़एक बीएसएफ जवान शिवकॉलनीत नातेवाईकांकडे आले होता. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सुरूवातीला त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले़ दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवरही ठेवण्यात आले होते़ या ठिकाणी एक ते दीड लाखांचा खर्चही झाला़ मात्र, नंतर ते कोरोना बाधित असल्याने त्यांना कोविड रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व गोदावरी रुग्णालयात आयसीयू खाली नव्हता.आमदार भोळे यांनी यामध्ये लक्ष घातले. दरम्यान, व्हेटीलेटरवरचा रुग्ण दगावल्यानंतर त्या ठिकाणी बेड उपलब्ध झाला अन्यथा तोही झाला नसता, असे भोळे यांनी सांगितले.
बीएसएफ जवानालाही व्हेंटिलेटर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:46 PM