धुळे,दि.16- बौद्ध धम्म पूर्णत: वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आहे. यामध्ये कोठेही कर्मकांडाला किंवा कल्पनांना स्थान देण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन बौद्ध साहित्याचे अभ्यासक व भिक्खू संघ ताडोबा (चंद्रपूर) चे भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले.
राष्ट्रीय बौद्ध महासभेतर्फे रविवारी शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर एक दिवसीय उत्तर महाराष्ट्रस्तरीय बौद्ध धम्म एकता महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या संमेलनाच्या परिसराला धनजी राघो झाल्टे, धम्मनगरी असे नाव देण्यात आले होते. यावेळी भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर यांचे प्रमुख धम्म प्रवचन झाले. यावेळी भन्ते गुणरत्न महाथेरो, भन्ते नागसेन, भन्ते गुणरत्न, भिक्खू प्रज्ञादीप आदी उपस्थित होते. विलास झाल्टे यांच्या हस्ते धम्म ज्योत प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते धम्म ध्वज फडकविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.कृष्णमोहन सैंदाणे होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष जि.का.गवळे होते.
यावेळी अमन कांबळे, संजय भामरे, डॉ.जगदीश पाखरे, डॉ.गौतम शिलवंत, दिलीप वानखेडे, धर्मेद्र झाल्टे, अविनाश थोरात, शांताराम जगताप, नाना साळवे, किशोर शिंदे, पंकज वाघ, आनंद सैंदाणे, रवी शिंदे, बाळासाहेब अहिरे, गौतम मोरे, सुरेश लोंढे, सिद्धार्थ पवार, रवी नगराळे, गौतम जावळे, सुनिल थोरात, बापू नेरकर आदी उपस्थित होते.