जळगाव- भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथे दलीत वस्तीतील महिला शौचालयाच्या जागेवर म्हशींचे गोठे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. कारवाईच्या मागणीसाठी लहु गुलाब ठाकरे हे जिल्हा परिषदेसमोर कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत़ बुधवारी या उपोषणाला दुसरा दिवस होता़गावात असलेल्या दलित वस्तीत महिला शौचालय उभारण्यात आले. मात्र काहींनी या जागेवर अतिक्रमण करुन म्हशींचा गोठा उभारला आहे. त्यामुळे परिसरातील महिलांची अडचण होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरी कुठलीही दखल घेण्यात येत नाही. तक्रार केल्याचा राग येऊन घरकुलाच्या रक्कमेचे धनादेश अडविण्यात आले. त्यामुळे लहू ठाकरे व द्वारकाबाई ठाकरे यांनी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणस्थळी ग्रामस्थांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
याठिकाणी शौचालयाच्या जागेवर बांधले म्हशीचे गोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 9:01 PM
भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथे दलीत वस्तीतील महिला शौचालयाच्या जागेवर म्हशींचे गोठे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. कारवाईच्या मागणीसाठी लहु गुलाब ठाकरे हे जिल्हा परिषदेसमोर कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत़ बुधवारी या उपोषणाला दुसरा दिवस होता़
ठळक मुद्देअतिक्रमण काढण्याची मागणीठाकरे कुटुंबीय बसले उपोषणालाबुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस