शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

वीज वाहक तार तुटल्याने गायीसह बैल मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:15 PM

भरपाई देण्याची मागणी, अभियंत्यांना घेराव

ममुराबाद : गावहाळ परिसरात गुरुवारी रात्री वीजपुरवठा सुरु असताना अचानक तार तुटून खाली पडल्याने गायीसह बैलाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी भरपाईची मागणी वीज कंपनीकडे केलीआहे.गावहाळलगत पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर शांताराम रामदास पाटील हे शेतकरी राहतात. त्यांनी नेहमीप्रमाणे गायीसह बैलजोडी घरासमोर बांधली होती. गुरुवारी रात्री वरून गेलेल्या जीर्ण वीजवाहक तारांपैकी एक तार अचानक तुटुन खाली पडली. काही कळण्याच्या आत विजेचा जोरदार धक्का बसल्याने गाय व एक बैल जागेवरच तडफडून मृत्युमुखी पडले.हाकेच्या अंतरावर बसलेले राजेंद्र भागवत पाटील व इतर काहीजण थोडक्यात बचावले. दरम्यान, आजुबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी विदगाव येथील उपकेंद्राला कळविले. अभियंत्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही.दुसºया दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीच फिरकले नाही.अभियंत्यांना घेराव १२ तासांपेक्षा जास्तवेळ अंधारातजीर्ण तार तुटून पडल्यानंतर विदगाव येथून खंडीत करण्यात आलेला ममुराबाद येथील वीजपुरवठा तब्बल १२-१३ तासानंतर दुसºया दिवशी सुरळीत झाला. ग्रामस्थांना अंधार व उकाड्यातच रात्र काढावी लागली. त्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात आली.शुक्रवारी सकाळी महावितरण कंपनीचे अभियंता सपके व भंगाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. याप्रसंगी माजी सरपंच रावसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी दोन्ही अभियंत्याना घेराव घातला. पंचनामा करुन शेतकरी शांताराम पाटील यांना तातडीने भरपाई देण्याची व्यवस्था करावी तसेच जीर्ण वीज वाहक तारा बदलण्यात याव्या, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव