अमित महाबळ, जळगाव : महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कराचा सोमवारी (दि.२७), एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक २ कोटी ३१ लाख रुपयांचा भरणा झाला. ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने ओव्हरलोड होऊन सिस्टीमचा सर्व्हर अर्धा तास डाऊन झाले होते. यामुळे करदात्यांचा खोळंबा झाला.
महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी अभय शास्ती योजना लागू केली असून, मंगळवारी अंतिम मुदत आहे. यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोमवारी कराची रक्कम भरण्यासाठी चारही प्रभाग कार्यालयात करदात्यांनी गर्दी केली होती. एकाच दिवसांत २ कोटी ३१ लाख रुपये वसूल झाले. यापैकी ३० लाख रुपये हे ऑनलाइन आले आहेत. त्यामुळे ओव्हरलोड होऊन सिस्टीमचा सर्व्हर अर्धा तास बंद होता. अभय शास्ती योजनेत आजपर्यंत १२ कोटी ९२ लाख रुपये वसूल झाले आहेत.
सोमवारची करवसुली
प्रभाग समिती १ - ६६.१७ लाखप्रभाग समिती २ - ३९.९२ लाखप्रभाग समिती ३ - ५७.२० लाखप्रभाग समिती ४ - ३५.७१ लाखमोबाईल टॉवर - ३२ लाखएकूण वसुली - २ कोटी ३१ लाख
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"