शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बुमराह कसोटीत मिळवू शकतो ४०० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:15 AM

मेलबर्न : ‘वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांच्या मते भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अन्य गोलंदाजांपेक्षा खूपच ...

मेलबर्न : ‘वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांच्या मते भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अन्य गोलंदाजांपेक्षा खूपच वेगळा आहे. आणि तो जर तंदुरुस्त राहिला तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेऊ शकतो.’ वेस्ट इंडिकडून ९८ कसोटी सामन्यात २०.९९च्या सरासरीने ४०५ बळी घेणाऱ्या एम्ब्रोस याने सांगितले की, सध्या भारतीय गोलंदाजांमध्ये त्यांना बुमराहने प्रभावित केले आहे.

एम्ब्रोस यांनी त्यांच्या कर्टली आणि करिश्मा शोमध्ये म्हटले की, ‘भारताकडे काही खूप चांगले गोलंदाज आहेत. मी बुमराहचा मोठा प्रशंसक आहे. मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे. तो सर्वांपेक्षा खूपच वेगळा आहे. तो इतका प्रभावी आहे आणि मला त्याच्याकडून आशा आहे. तो खूप चांगला खेळ करेल.’

तो ४०० बळी घेऊ शकतो का, यावर एम्ब्रोस यांनी म्हटले की, ‘जर तो फिट राहिला आणि योग्य वेळेपर्यंत खेळला तर तो असे करू शकतो. तो सीम आणि स्विंग करू शकतो आणि यॉर्करही उत्तम टाकतो. त्याच्याकडे क्षमता आहे. तो बराच काळ खेळला तर मला आशा आहे की तो हे यश नक्कीच मिळवू शकतो.’

२०१८मध्ये कसोटीत पदार्पण करणाऱ्या बुमराहने फक्त १९ कसोटीत २२.१०च्या सरासरीने ८३ बळी घेतले आहेत. भारतीय संघाचा तो महत्त्वाचा भाग आहे.’

कर्टनी वॉल्श यांच्यासोबत कसोटी इतिहासातील सर्वात खतरनाक जोडींपैकी एक असणाऱ्या एम्ब्रोस यांच्या मते भारतीय गोलंदाज त्यांच्या छोट्या रन अपमुळे आपल्या शरीरावर अधिक दबाव टाकतात.’

त्यांनी सांगितले की, जलदगती ही लयीसोबत जोडली गेलेली असते. त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला चांगली लय गरजेची असते.’

एम्ब्रोसने सांगितले की, बुमराहचा रनअप खूपच छोटा आहे. तो आपला रनअपमध्ये फक्त चालतो आणि चेंडू फेकण्याच्या आधी काही पावले जोरात येतो. त्यामुळे त्याच्या शरीरावर अधिक दबाव येतो. आणि जर तो मजबूत राहू शकत असेल तर मला वाटते की यात अडचण नाही.’

भारताला १८ जूनला साऊथम्पटनमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात आपला पहिला विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील सामना खेळणार आहे. आणि ॲम्ब्रोसच्या मते चांगले सलामीची जोडी ही विराटसाठी महत्त्वाची ठरेल. हे महत्त्वाचे आहे. कारण लवकर एक-दोन बळी गेले तर कर्णधार कोहली लवकरच गोलंदाजांच्या निशाण्यावर येतो. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजही अडचणीत येतात.’