जळगाव- गेंदालाल मिल परिसरातील लाकुड पेठेतील शेख जसीम शेख शरीफ यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे़लाकुड पेठेतील रहिवासी शेख जसीम शेख शरीफ हे कुटुंबियांसह राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेल्या होत्या. गुरुवारी रात्री शेख व त्यांची आई जवळच राहत असलेल्या नातेवाईक अफसाना शेख यांच्याकडे झोपण्यासाठी गेले़ ही संधी साधत चोरट्यांनी रात्री घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून कपाटातील ३१ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा हार, तसेच १ तोळ्यांचा सोन्याचा मंगळसुत्र व १० हजार रूपयांची रोकड असा ७१ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़जसीम यांचे भाऊ समीर हे सकाळी घरी परतले़ यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचा कुलूप तुटलेला व दार उघडे दिसले़ घरातील सामानाची पाहणी केली असता त्यात सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे त्यांना दिसले़ याबाबत पोलिसांना माहिती दिली.
जळगावातील गेंदालाल मील परिसरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:19 PM
गेंदालाल मिल परिसरातील लाकुड पेठेतील शेख जसीम शेख शरीफ यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे़
ठळक मुद्देकुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेशशुक्रवारी सकाळी सहा वाजता घटना७१ हजार रुपयांचा ऐवज केला लंपास