भुसावळ : शहरातील गवळीवाडा या भरवस्तीत दिवसाढवळ्या चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करीत वीस हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना गुरुवार घडली. याबाबत शनिवारी शहर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे.वृत्त असे की, येथील रहिवासी मोहम्मद शोएब मोहम्मद सादिक रेल्वेत नोकरीला असून ते सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत ड्युटीवर असताना घरी कोणीही नाही याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोडा तोडून आत प्रवेश करीर कपाटातील वीस हजार रुपये रोख व दोन एटीएम कार्ड चोरून नेल्याची घटना घडली. शोएब हे कामावरून घरी परतल्यावर दरवाजाचा कडीकोडा तुटलेला पाहून चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केलेला आढळला तसेच घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराही चोरून नेला. याबाबत शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सैय्यद करीत आहे. प्रत्येक दिवशी शहरात चोरीच्या घटना घडत असल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. दरम्यान मोहम्मद शोएब यांनी सजगता ठेवत घरात सीसी कॉमेरा लावलेला असल्यावरही चोरटे चोऱ्या करुन कॅमेरे पळवत असल्याने नागरिकांच्या सर्तकतेलाही चोरट्यांनी सुरूग लावल्याची चर्चा आहे.एक पुरावा निदर्शनातचोरट्यांनी चोरी केली परंतु १ वाजुन १४ मिटाटांनी घरमालकास आलेला बँकेचा मेसेज चोरांना पकडण्याच्या कामी पडेल.चोरट्यांनी चोरी केल्यानंतर एटीएम मध्ये जाऊन कार्ड वापरल्याने त्याचा मेसेज घर मालकाला आल्याने त्यांनी कोणत्या एटीएमचा वापर केला आणि एटीएम मधील कॅमेरा रेकॉर्ड झाले असेलच त्यामुळे चोरांनी एकप्रकारे हा पुरावाच सोडला असून याद्वारे त्यांचा शोध लागू शकतो.
भरदिवसा केली घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 7:58 PM