रवींद्र चुडामण खाचणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की जिल्हा परिषद हायस्कूलसमोरील रोडलगत असलेल्या घरात कुटुंबासह झोपलेले असताना त्यांच्याच शेताला लागूनच ५० फूट अंतरावर दुसरे पत्री घर आहे. त्या पत्री घरात गोदरेजचे कपाट आहे व त्याला लोखंडी दरवाजाला चावीसह लावून कुलूप लावण्याची विसरलो होतो. मुलगी हर्षदा दि. १० जानेवारीला मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास उठली व घराच्या बाहेर आली. त्यावेळी तिला पत्री घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने घरातील कुटुंबीयांना उठविले. या कपाटामधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेला व जमिनीवर टाकलेला आढळून आला. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी उसनवार आणलेले पैसे त्यांनी कपाटात तिजोरीत ठेवले होते. रवींद्र खाचणे यांचा भाचा दीपक सुधाकर पाटील (रा. औरंगाबाद) यांच्याकडून ट्रॅक्टरचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी उसनवार पैसे घेतले होते. त्यासोबतच त्यांचा मुलगा तुषार व मयूर खाचणे यांच्याकडून आणलेले पैसेसुद्धा कपाटात ठेवले होते, असे एकूण दोन लाख २२ हजार ६०० रुपये अज्ञात चोरट्यांनी
पत्री घराच्या दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करून लांबविले. त्याबाबत रवींद्र खाचणे यांनी फिर्याद दिली आहे.