जामनेर : राज्याच्या गृहमंत्र्यांवर होत असलेले आरोप गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. निष्पक्ष चौकशीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. रविवारी सकाळी पालिका चौकात राज्याच्या गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजपकडून दहन करण्यात आले. तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर गोविंद अग्रवाल, जीतू पाटील, महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, अतीश झाल्टे, बाबूराव हिवराळे, आनंदा लव्हारे, तुकाराम निकम, विलास पाटील, दत्तात्रय सोनवणे, जावेद मुल्लाजी, सुहास पाटील, दीपक तायड़े, अनिस शेख, सुभाष पवार, कैलास पालवे, रवींद्र झाल्टे, रवींद्र बंडे, श्याम गुजर, खलीलखान उपस्थित होते.
जामनेरला गृहमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:42 PM