पातोंडा, ता. चाळीसगाव - येथील शेतकरी माधव सजन रोकडे व तुकाराम सजन रोकडे या शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतातील संपूर्ण ऊस, ठिबक संच असे साहित्य जळून खाक झाले. सुमारे तीन लाखाच्या उसाचे व एक लाखाच्या ठिबकचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक बंब बोलाविण्यात आले, मात्र तो पर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. तलाठी एस. बी . पवार, कोतवाल विठोबा माळी, पोलीस पाटील शरद महाजन यांनी पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 6:27 PM