संजय सोनार, नगरदेवळा, (जि.जळगाव): रविवारी रात्रभर झालेल्या परतीच्या पावसाने नगरदेवळा (ता.पाचोरा) परिसरातील तितूर,अग्नावती, गडद, अरुणावती, नद्यांना पूर आला आहे. यामुळे नगरदेवळा येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे.
तसेच शेतशिवारातील कपाशी, केळी, मका, ज्वारी, बाजरी, मूग आदी पिके जमिनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नगरदेवळा येथील अग्नावती नदी पात्रातील बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या या नदीवरील चारही फरशीपुल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क खंडीत होऊन शेतकरी, विद्यार्थी, नोकरवर्ग, व व्यवसासिकांचे मोठे नुकसान झाले आहे.