भुसावळ/ जामनेर : औरंगाबाद- भुसावळ बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील सुमारे दीड लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरूवारी घडली. या घटनेनंतर महिलेल्या तक्रारीवरून बस डीवायएसपी कार्यालयात आणून बसमधील प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र हा प्रकार जामनेर दरम्यान घडला असल्याचे या महिलेने सांगितल्यानंतर तक्रार देण्यासाठी या महिलेस जामनेर गाठावे लावले होते.या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद - भुसावळ या बस क्रमांक एम . एच. २० - २५०५ मधून स्रेहा सौरभ वकटे , रा. सिंहगड कॉलनी , वृंदावन बंगला , पिंपरी-चिंचवड पुणे या त्यांच्या आईसोबत भुसावळ येथे येत होत्या. मात्र त्यांच्या पर्समधील चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र व तीन ग्रॅम सोने , असा दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही घटना चार वाजेच्या सुमारास जामनेर ते भुसावळ दरम्यान घडली. याची तक्रार महिलेने बस वाहकाकडे केली मात्र वाहकाच्या लक्षात हा प्रकार आला नाही.जामनेर येथे जाण्याची सूचनाकाही वेळानंतर वाहकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एसटी बस ही भुसावळ येथील तालुका पोलिस ठाण्यांमध्ये ४.४५ च्या सुमारास आणली. यावेळी पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केली. मात्र प्रवाशां जवळ काहीही सापडले नाही . दरम्यान , घटनाही जामनेर च्या जवळ घडली असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी स्नेहल वकटे या जामनेर येथे गेल्या . तर एसटी बस भुसावळ आगारात रवाना करण्यात आली.