ऑनलाईन लोकमत जळगाव,दि.27 - आगारातून बाहेर निघालेली बस प्रवाशाने हात देऊनही थांबली नाही. याबाबत प्रवाशाने ऑनलाईन तक्रार केल्याने संबधितांविरूद्ध नोटीस काढण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे तक्रारीसाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक तसेच ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध करुन दिली आह़े जळगाव-चोपडा बस आगारातून बाहेर निघाली़ ही बस थांबविण्यासाठी एका प्रवाशाने हात दिला़ मात्र तरीही बस थांबली आह़े याबाबत तक्रारदाराने महामंडळाच्या ऑनलाईन वेबसाईटवर बस चालक व वाहकाविरोधात तक्रार नोंदविली़ आठवभरापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीची विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्याकडून दखल घेण्यात आली़ त्यांनी याबाबत बसस्थानक प्रमुख, वाहतूक अधिकारी व आगार व्यवस्थापक यांना कारवाईच्या सुचना दिल्या. जळगाव-चोपडा बसवरील वाहक मिलींद साळुंखे तर चालक सोपान सपकाळे अशी दोघा कर्मचा:यांची नावे आहेत़ गुरुवार, 27 रोजी आगार व्यवस्थापक पी़एस़बोरसे यांनी संबंधित कर्मचा:यांचे जवाब नोंदविल़े तसेच त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आलेली आह़े
बस न थांबविणा:या वाहक व चालकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:12 PM