जळगाव : गर्दीचा फायदा घेत आव्हाणे येथील नंदकिशोर नामदेव वाणी (वय ४०) या प्रवाशाच्या खिशातील ४० हजार रुपये लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याबाबत वाणी यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. मात्र पैसे चोरी झालेले नाहीत, तर खिशात ठेवतानाच ते पडल्याचे सांगून पोलिसांनी तक्रार घेतली नाही.नंदकिशोर वाणी हे सोमवारी औरंगाबादला जाण्यासाठी आव्हाणे येथून कानळदा बसमधून जळगाव स्थानकावर आले. औरंगाबादला जात असताना आर.एल चौकाजवळ पॅँटच्या खिशातील ४० हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथेच उतरुन थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. पॅँटच्या चोर खिशात ही रक्कम ठेवली होती.खिसा फाटलेला नाही किंवा कापलेला नाही. तसेच शर्टाच्या खिशात सातशे रुपये सुरक्षित होते. त्यामुळे या पैशांची चोरी झालेली नाही असे पोलिसांनी वाणी यांना सांगितले. त्यामुळे त्यांची तक्रारही घेण्यात आली नाही.
बसमधून प्रवाशाचे ४० हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:34 PM
गर्दीचा गैरफायदा
ठळक मुद्देतक्रार घेण्यास नकार