लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.30 : पूर्वसूचना न देता सोमवारी येथील व्यापा:यांनी बाजार समितीत लिलाव प्रक्रिया थांबवल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त करून सभापती व उपसभापती दालनाची काच फोडली. तथापि दुपारी 2 वाजेला पदाधिका:यांच्या व अधिका:यांच्या मध्यस्थीने लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला. शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भाव देऊन व्यापा:यांनी शेतक:यांना लुटल्याची तक्रार गावरान जागल्या सेनेसह 67 शेतक:यांनी केली होती. मात्र महिना उलटूनही याबाबत चौकशी झाली नाही, म्हणून व्यापारी दोषी असतील तर शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याच्या सूचना उपसभापती अनिल पाटील यांनी केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याचा गैरअर्थ काढत सरसकट सर्व व्यापा:यांनी 30 रोजी लिलावाला सुरुवात न केल्याने 12 वाजेपयर्ंत बाजार समितीचे आवार कृषी माल आणलेल्या वाहनांनी भरले होते. त्यामुळे शेतक:यांमध्ये संतप्त भावना पसरली होती. तर दुसरीकडे व्यापा:यांनीही बाजार समितीने प्रतवारी करावी मग लिलाव करू अशी ठाम भूमिका घेतली. शासनच जर मूग -उडीद, तूर 3800 ते 4000 भावात विकत असेल तर आमचा माल कसा घेतला जाईल त्यामुळे हमी भावात माल घेणे परवडत नाही अशी भूमिका व्यापा:यांनी मांडली. धरणगाव, चोपडा येथे बाजार समिती लिलाव करते मात्र तेथे भाव कमी आहेत. तसेच आधारभूत किंमत काय आहे हे व्यापा:यांना माहीतच नाही, ते पत्रच दाखवण्यात आले नाही असे व्यापारी म्हणाले असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, सभापती उदय वाघ मुंबईला, उपसभापती अनिल पाटील नाशिकला तर सचिवही बाहेरगावी गेले होते. ब:याच वेळाने संचालक उदय पाटील, प्रफुल्ल पवार बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी व्यापा:यांची अडचण समजावून प्रतवारी करण्यास येणा:या अडचणीमुळे सर्वांसाठी शक्य नाही. ज्यांना भाव कमी वाटत असल्यास त्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, त्याला न्याय दिला जाईल अशी भूमिका मांडण्याचा प्रय} केला. तेव्हा खेडीढोकचे शेतकरी प्रवीण राजपूत यांनी व्यापारी न सांगता शेतक:यांना वेठीस धरतात. लिलाव बंद पाडतात, याबाबत संचालकांनी शेतक:यांची बाजू घ्यावी असे सांगितले .तर रामकृष्ण पाटील यांनी मॉइश्चर मशिन खराब असल्याचा आरोप केला. यावेळी संतप्त शेतक:यांनी संचालकांनी व्यापा:यांची बाजू घेऊ नये आणि योग्य हमी भाव द्यायला सांगा असे खडसावून संगितले. लवकर लिलाव चालू होत नाही म्हणून संतापाच्या भरात अज्ञात शेतक:याने सभापती दालनाची काच फोडली. तर काही शेतक:यांनी माजी सभापती अनिल पाटील यांच्याकडेही तक्रारी केल्या . त्यावेळी त्यांनी गेल्या 10 वर्षात असा प्रकार घडला नाही, प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला . यावेळी सहायक निबंधक कार्यालयातील एन. के. पाटील यांनी व्यापा:यांना न सांगता लिलाव बंद केला आहे, कायद्याने हे चुकीचे आहे. व्यापारी ऐकत नसतील तर दंडाच्या नोटीसा द्याव्यात असे सांगितले तर उपसचिव मंगलगीर गोसावी यांनी व्यापा:यांना लेखी पत्र देऊ असे सांगितले. अखेर सभापती , उपसभापती आल्यानंतर संयुक्त बैठकीत योग्य निर्णय घेऊ. आज शेतक:यांना ताटकळत ठेवू नका आणि लिलाव चालू करा अशी भूमिका उदय पाटील व प्रफुल्ल पाटील, कर्मचारी सुनील शिसोदे यांनी मांडल्याने लिलावाला सुरुवात झाली.
व्यापा:यांनी लिलाव थांबविल्याने शेतक:यांचा संताप,सभापतींच्या दालनाची फोडली काच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 6:36 PM
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी व्यापा:यांनी लिलाव प्रक्रीया सुरू न केल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पदाधिका:यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.
ठळक मुद्देलिलाव सुरू न झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांची झाली गर्दी.शेतकरी आणि व्यापा:यांमध्ये वादंग