चाळीसगाव, जि. जळगाव : बी - बियाणे विक्रेते दीपक उर्फ शिवाजी श्रीराम पाटील (वय ३५) या व्यवसायिकाने विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता स्टेशन रोड स्थित सुभाष रेसिडेन्सीमध्ये उघड झाली आहे. मृत व्यवसायिक हातले येथील असून तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते. मंगळवारी ते हरविल्याची फिर्याद चाळीसगाव पोलीस स्थानकात देण्यात आली होती.हातले येथील बी - बियाणे विक्रेते दीपक उर्फ शिवाजी श्रीराम पाटील (वय ३५) यांचा मृतदेह मंगळवारी रात्री नऊ वाजता सुभाष रेसिडेंन्सी मध्ये रुम क्र. १११ मध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी द्रवाची बाटली आढळून आल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी. असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दीपक उर्फ शिवाजी पाटील हे तीन दिवसांपासून बेपत्ता झाले होते. मंगळवारी ते हरविल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यावर तपास सुरु झाला.मोबाईल ट्रॅकरने दाखविले लोकेशनदीपक उर्फ शिवाजी पाटील यांच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले. यासाठी पोलिसांनी मोबाईल ट्रॅकर वापरले. ट्रॅकरवर स्टेशन रोड लगत सुभाष रेसिडेंन्सीमध्ये लोकेशन मिळाल्याने रुम क्र. १११ जवळ उग्र वास येत होता. रुमचा दरावाजा तोडण्यात आला. यावेळी त्यांचा मृतदेह आढळून आला. रेसिडेंन्सीमध्ये उग्र वास येत असतानाही रुमची तपासणी का करण्यात आली नाही ? असा प्रश्न मृताच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे करीत आहे.
चाळीसगावला लॉजमध्ये व्यवसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:08 PM
तीन दिवसांपासून होते बेपत्ता
ठळक मुद्दे रेसिडेंन्सीमध्ये उग्र वास अकस्मात मृत्यूची नोंद