जळगाव: विसनजी नगरात महालक्ष्मी स्वीट या दुकानाला लागून असलेल्या दूध संघाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री दुकानाचा कडी कोयंडा तोडून तीन हजार रुपयांची चिल्लर लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात नोंद झालेली नाही.जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे नियंत्रण असलेल्या या दूध संघाच्या दुकानात दूध, गावराणी तूप, दही, लोणी यासह अन्य दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. या दुकानाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी गल्लयातील तीन हजार रुपयांची चिल्लर लांबविल्याचा प्रकार रविवारी दुकान उघडतांना लक्षात आला. अन्य कोणत्याही वस्तूला चोरट्यांनी हात लावलेला नाही असे सूत्रांनी सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर फेडरेशनच्या कर्मचाºयांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली. किरकोळ रक्कम चोरी गेल्याचे कारण पुढे करुन याप्रकरणी कोन्हीही तक्रार दिली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांनी दिली.
चोरट्यांनी फोडले दुधाचे बुथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 5:06 PM
विसनजी नगरात महालक्ष्मी स्वीट या दुकानाला लागून असलेल्या दूध संघाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री दुकानाचा कडी कोयंडा तोडून तीन हजार रुपयांची चिल्लर लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात नोंद झालेली नाही.
ठळक मुद्देतीन हजार रुपयांची चिल्लर लांबविण्यात आल्याची घटना याप्रकरणी तक्रार दिली नाही कडी कोयंडा तोडला