आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२४ : नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २८ कोटी २५ लाख रुपये किंमतीची सुमारे ५१ हजार ८४५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, पूर्वीच आॅनलाइन नोंदणी झालेल्या, परंतु खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांच्या तूर खरेदीसाठी शासनाने १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी ४ हजार क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदीनाफेडमार्फत ५४५० रुपये प्रती क्विंटलप्रमाणे हमीभाव जाहीर करीत शासनाने जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव येथे फेब्रुवारी २०१८ मध्ये खरेदी केंद्र सुरू केले होते. त्यासाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. केवळ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी या केंद्रांवर केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 7:57 PM
नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २८ कोटी २५ लाख रुपये किंमतीची सुमारे ५१ हजार ८४५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे७० टक्के रक्कम शेतक-यांना अदातूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढआॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतक-यांचीच तूर खरेदी