जळगाव : दिवाळी सणासाठी फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत असून भाव स्थिर असल्याने ग्राहकांना यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्याचा सध्यातरी विक्रीवर परिणाम नसून या निर्णयानुसार फटाके दोन तास फोडायचे असल्याने राज्य सरकार कोणते दोन तास ठरवून देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.दिवाळी सणात महत्त्वाचा घटक असलेल्या फटाक्यांची बाजारपेठ गेल्या महिन्याभरापासूनच सज्ज झाली असून जसजसी दिवाळी जवळ येत आहे, तसतसी फटाके खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. सध्या बाजारात किरकोळ फटाके विक्रीसह होलसेल विक्रेत्यांकडेही गर्दी होत असल्याचे चित्र आहे.अभ्यंग स्नानाला फटाके फोडण्याची मुभा मिळण्याची शक्यता२३ रोजी फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत फटाक्यांची आॅनलाइन विक्रीस नकार देण्यासह केवळ परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात, असे निर्देश दिले होते. सोबतच दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील रात्री ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच ठरवून दिली होती. मात्र त्यानंतर या निर्णयात थोडा बदल करीत राज्य सरकारने फटाके फोडण्याच्या वेळेसंदर्भात निर्णय घेण्याविषयी निर्देश दिले. त्यानुसार दिवाळीत अभ्यंग स्नानाला फटाके फोडण्याची मुभा मिळू शकते, असे सांगितले जात आहे.कमी प्रदूषण करणारे फटाके विक्री बाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी यंदाच्या दिवाळीपासून नसल्याने सर्वच प्रकारच्या फटाक्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे विक्रीवर परिणाम नसून दिवाळीमध्ये कोणत्या दोन तासात फटाके फुटले जाऊ शकतात हे आता प्रत्येकाच्या हाती असल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. एकूणच सध्यातरी फटाके विक्रीवर कोणताही परिणाम नसल्याचे चित्र बाजारापेठेत आहे.बाजारात फॅन्सी फटाके, विविध प्रकारचे रॉकेट, फ्लॉवर पॉटमध्ये रंगीला, बो-बो, क्रॉकलिंग, मल्टी कलर पॉट तर चक्करमध्ये २५ शॉटस्, ५० शॉटस्, १०० शॉटस्, २०० शॉटस्, ५०० शॉटस् हे फटाके तसेच विविध आकारातील फटाक्यांचे बॉक्सदेखील पसंतीस उतरत आहे.फटाके विक्रीसाठी बंधने नाही. होलसेल विक्रेत्यांकडून आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यातच फटाक्यांची खरेदी झालेली आहे. कोणते फटाके विक्री करावे व कोणते नाही, याबाबतची अंमलबजावणी पुढील वर्षापासून होऊ शकते.- हरिष मिलवाणी, फटाके उत्पादकबाजारपेठेत विविध प्रकारचे फटाके उपलब्ध असून सर्वच प्रकारच्या फटाक्यांना चांगली मागणी आहे. फटाके विक्रीवर परिणाम झालेला नाही.- युसुफ मकरा, कार्याध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायर वर्क्स असोसिएशन.
आली दिवाळी : जळगावात फटाके बाजारात जोरदार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:54 AM
खरेदीसाठी गर्दी
ठळक मुद्देदोन तासाच्या निर्बंधाकडे आता लक्षसर्वच प्रकारच्या फटाक्यांना मागणी