शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

दिव्यांग करणार ‘कलेक्टोरेट’ पायऱ्यांना बायपास: सेवेत दाखल होणार ‘लिफ्ट’ची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 8:09 PM

ऑगस्टमध्ये मिळणार त्रासातून मुक्ती

कुंदन पाटील, जळगाव : दिव्यांगांना वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने  'सुगम्य भारत' योजना हाती घेतली आणि त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी ‘लिफ्ट’ची उभारणी सुरु झाली आहे. येत्या दीड महिन्यात लिफ्टच्या यंत्रणेसाठी बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यानंतर विद्युतीकरणासह लिफ्टच्या उभारणीनंतर ऑगस्टपासून दिव्यांगांना पायऱ्यांवरच्या कसरतीपासून मुक्ती मिळणार आहे.

२६ लाख रुपये खर्चाची ही यंत्रणा 'सुगम्य भारत' योजनेंतर्गत उभारली जात आहे. ही सुविधा सेवेत दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक दिव्यांगांना लिफ्टद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचविण्यासाठी ही यंत्रणा आधार ठरणार आहे.दोन्ही बाजूने प्रवेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रदर्शनी भागाकडून येणाऱ्या दिव्यांगांची व्हीलचेअर सरळ लिफ्टमध्ये जाण्यासाठी बांधकाम करण्यात आले आहे. तर मागील बाजूकडून येणाऱ्या  जमिनीच्या पातळीपासून असणाऱ्या साधारणत: पाच फूट उंचीच्या लोखंडी ‘रॅम्प’द्वारे दिव्यांगांची व्हील चेअर सरळ लिफ्टमध्ये प्रवेश केला.लिफ्टने दिव्यांग थेट ‘रिसेप्शन’ कक्षात पोहोचेल. त्यानंतर ते तिथून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सहजच जाऊ शकतील.

‘पुरातत्व’ विभागाची परवानगीजिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही १५० वर्षांपूर्वीची आहे. ‘हेरिटेज’ प्रकारातील इमारत असल्याने पुरातत्वसह अन्य विभागांची मंजुरी आवश्यक असते. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी लिफ्टचे काम करण्यासाठी‘ हेरिटेज’ समितीच्या परवानगीसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकरवी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार  परवानगी मिळाल्यावर या कामाला सुरुवात झाली आहे.

काय आहे 'सुगम्य भारत'?देशातील लोकसंख्येच्या तुलनेतच असलेल्या तीन टक्के व्यक्ती दिव्यांगांचा शारीरिक, मानसिक अशा त्रासांपासून मुक्ती मिळावी, यासाठी केंद्र शासनाने 'सुगम्य भारत' योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून शहरांतील शासकीय इमारती तसेच सार्वजनिक जागांमध्ये वावरताना दिव्यांगांना येणारे तांत्रिक अडथळे दूर करणे वा त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून रॅम्प, व्हीलचेअर, लिफ्ट आदी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव