तोंडापूर, ता.जामनेर : येथील राक्षा शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याजवळ मंगळवारी तीन अस्वलांचा कळप आढळून आला. यामुळे वनविभाग अचंबित झाला आहे.तोंडापूर परिसरातील राक्षा शिवारात बिबट्याने धुमाकुळ घातल्याने शेतकºयांनी अजिंठा वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करावे या आशयाचे निवेदन दिले होते. वन विभागाने या तक्रारीची दखल घेत बिबट्याला पकडण्यासाठी राक्षा शिवारात एक पिंजरा लावला होता.बिबट्या या पिंजºयात सापडावा यासाठी जिवंत कुत्रा ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी पिंजरा लावलेल्या ठिकाणी तीन अस्वलांचा कळप आला.शेतकºयांच्या लेखी तक्रारीनंतर वनविभागाने पिंजरा लावला आणि गस्त सुरु केली. बिबट्यासाठी लावलेल्या पिंजºयाजवळ अस्वलांचा कळप आल्याचा प्रकार गस्त घालत असलेल्या वन कर्मचाºयांच्या निदर्शनास आला. कर्मचाºयांनी या अस्वलाचे फोटो देखील काढले. कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन हा कळप याठिकाणी आला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे वनविभागाचे कर्मचारी अचंबित झाले आहे.
बिबट्यासाठी पिंजरा अन् अस्वलाचा फेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 7:02 PM
बिबट्याने धुमाकूळ घातल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याजवळ मंगळवारी तीन अस्वलांचा कळप आढळून आला. यामुळे वनविभाग अचंबित झाला आहे.
ठळक मुद्देअजिंठा वन विभाग अचंबिततोंडापूर परिसरातील राक्षा शिवारातील घटनातीन अस्वलांचा आला होता कळप