जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची झलक सोशल मीडियावर दिसायला लागली आहे. भाजप, राष्ट्रवादीने प्रचार फेरीच्या माध्यमातुन मतदारांशी संपर्कास सुरुवात केली आहे. प्रशासनाने मंगळवारी शहरात पथनाट्याद्वारे मतदार जागृती मोहीम राबविली. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीसाठी गुरुवारपर्यंत मुदत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.बुधवारी कुणीही माघार घेतलेली नसल्याने उद्या माघारीसाठी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मनसेच्या प्रचार कार्यालयात माघारीबाबत खलबते होतांना दिसून आली. माघारीसाठी दबाव तंत्रा बरोबरच आर्थिक देवाणघेवाणीची चर्चाही रंगत आहेत. सद्यस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ४ व नगरसेवकपदासाठी ६३ अर्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांनी विविध प्रभागातून मतदार संपर्क रॅली काढली. गोविंद अग्रवाल, सुनील शिनकर, उत्तम थोरात, प्रकाश झंवर, अमृत खलसे, गजानन धनगर, नारायण गुजर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.सध्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचाराची रंगत फेसबुकसह सोशल मिडीयावर दिसत आहे.दरम्यान, प्रशासनाने मतदार जागृतीसाठी शहरातील विविध भागात बॅनर लावले आहे. संतोष सराफ पथनाट्याच्या माध्यमातुन चौकांमध्ये मतदारात जागृती करीत आहे.
शेंदुर्णी नगरपरिषदेसाठी सोशल मीडियावर प्रचाराला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 9:44 PM
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची झलक सोशल मीडियावर दिसायला लागली आहे. भाजप, राष्ट्रवादीने प्रचार फेरीच्या माध्यमातुन मतदारांशी संपर्कास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देउमेदवार अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवसपथनाट्याद्वारे मतदार जागृती मोहिमपक्षांच्या कार्यालयात माघारीबाबत खलबते