शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जळगावातील समांतर रस्त्यासाठी १०० कोटी मिळणे अशक्य, एकनाथ खडसे यांचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:44 PM

महामार्ग मनपाकडे असल्याने महामार्ग प्राधीकरणाकडून निधी कसा मिळणार ?

ठळक मुद्देमाहिती नसल्याने १०० कोटी मंजूरआश्वासनाचा जिल्हाधिका-यांनी पाठपुरावा करावापर्याय असतोच, मात्र थोड्याकाळासाठी नुकसान होतेच

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १० - शहर व जिल्हावासीयांचा जिव्हाळ््याचा विषय असलेल्या समांतर रस्त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले असले तरी महामार्ग जळगाव महापालिकेच्या ताब्यात असल्याने त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून निधी मिळणे शक्य नसल्याचा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी केला. या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने निधी मिळण्यास अडचण येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी संध्याकाळी पत्रपरिषद झाली, त्या वेळी बोलताना त्यांनी हा दावा केला.माहिती नसल्याने १०० कोटी मंजूरसमांतर रस्त्याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, २०१२मध्येच हा महामार्ग जळगाव महापालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी देण्यात आला असून तसे मनपाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र करून दिले आहे. या बाबत गडकरी यांना माहिती नसल्याने निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र महामार्गाची जबाबदारी मनपाकडे असल्याचे लक्षात आल्याने महामार्ग प्राधीकरण निधी मंजूर करू शकत नाही, असा खडसे यांनी स्पष्ट केले.प्रतिज्ञापत्र रद्द करावे लागणारमहामार्गाबाबत मनपाने न्यायालयात केलेले प्रतिज्ञापत्र रद्द करीत नाही व त्याची मालकी जो पर्यंत प्राधीकरणाकडे येत नाही तो पर्यंत १०० कोटी मिळणे अवघड असल्याचेही खडसे यांनी सांगितले.आश्वासनाचा जिल्हाधिका-यांनी पाठपुरावा करावासमांतर रस्त्यासाठी गेल्या महिन्यात समांतर रस्ते कृती समितीने आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी १०० कोटीचा निधी मिळाल्याचे सांगून त्यातून एप्रिल महीन्यापर्यंत समांतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते.या बाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, लेखी आश्वासनाची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची आहे, त्याचा पाठपुरावा त्यांनी करावा, असे स्पष्ट केले.तरसोद ते चिखली चौपदरीकरणाचे तिसºया ठेकेदारानेही काम सोडलेसमांतर रस्त्यासोबतच महामार्ग चौपदरीकरणाचाही विषय महत्त्वाचा असला तरी तरसोद ते चिखली दरम्यानच्या कामास सुरुवात होत नसल्याबद्दल खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या कामास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. या पूर्वी दोन ठेकेदार बदलले, आता तिसºयानेही काम सोडले असल्याचा दावा खडसे यांनी केला.शनिवारी मोठा गौप्यस्फोट?पत्रकारांशी संवाद साधताना शेवटी खडसे म्हणाले की, शनिवारी आणखी मोठी बातमी देणार आहे. यामुळे एकनाथराव खडसे आणखी काय गौप्यस्फोट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.पर्याय असतोच, मात्र थोड्याकाळासाठी नुकसान होतेचखान्देशात आपणास पर्याय नाही, असे विचारले असता खडसे म्हणाले, पर्याय असतोच पंडित नेहरु यांच्यानंतर इंदिराजी चांगल्या पंतप्रधान झाल्या, त्यानंतर अटलजी व आता मोदीजी चांगले पंतप्रधान आहे. पर्याय नसतो, असे नाही मात्र केवळ थोड्याकाळीसाठी नुकसान होते, असेही स्पष्ट केले. खान्देशात अनेकांना भाजपात आणले व १९८९पासून दोन वेळचा अपवाद वगळता सातत्याने भाजपाचे खासदार निवडून आले असल्याचे सांगून त्यांनी उत्तर महाराष्ट्र भाजपाचे बलस्थान असल्याचे नमूद केले.रेशन गोदाम अनियमितता प्रकरणी निलंबनाचे आदेशभुसावळ येथील रेशन गोदाम तसेच जिल्ह्यातील तपासणीच्या अहवालाबाबत विचारले असता अहवालात आलबेल असल्याचे खडसे यांचे म्हणणे आहे. कारण यामध्ये तपासणी दरम्यान संबंधितांना आठ दिवसांची संधी मिळाली. या बाबत अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याशी आज बोललो असता काहींच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये गोडाऊन किपर व अव्वल कारकून यांचा प्रथम समावेश असून इतरांचेही निलंबन होईल, असा दावा त्यांनी केला.रोज बातम्या येतील इतक्या मंजुरी आणल्याबोदवड येथील पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून त्यास निधी मंजूर केला असल्याचे खडसे म्हणाले. यासोबत ४० कोटींच्या कामांचा निधी मंजूर करून आणला असून रोज बातम्या येतील इतका निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांचे मूल्यमापन तुम्ही करापालकमंत्री चंद्रकांत पाटील हे धावती भेट देतात, याबाबत विचारले असता खडसे म्हणाले, या बाबत मी कॉमेण्ट करीत नाही, याचे मूल्यमापन तुम्हीच करा, असे स्पष्ट केले.

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसे