जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या लीना महाजन, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, शिवसेनेचे शहर प्रमुख विकास धनगर, मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अमीनाबी नजीर, सरला महाजन, लीना पाटील, मालती घोडकर, गणेश चव्हाण, सोनाली चव्हाण, सुरेखा माळी, अरुण भोई, रवींद्र चौधरी, संदीप पाटील, सुनील महाजन यांच्यासह अनेक आजी-माजी ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात अनेक उमेदवारांनी आपली सपत्नीक उमेदवारी दाखल केली आहे. नशिराबादला आतापर्यंत तब्बल ८२ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.
नंतर फजिती नको रे बाबा नेमकी
निवडणूक ग्रामपंचायतची होणार की नगरपंचायतची या संभ्रमावस्थेत असतानाच अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. ग्रामपंचायतची निवडणूक झाली तर त्यामुळे नंतर फजिती नको रे बाबा असं म्हणत अनेकांनी उमेदवारी दाखल केली असल्याचे सांगण्यात येत आहे.