शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

उमेदवारांकडून मतदारांना खुलेआम पैसेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:57 PM

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर

ठळक मुद्देनिवडणूक व पोलीस यंत्रणेकडून सोयीस्कर कानाडोळा ‘सेंट लॉरेन्स’मधील यंत्र बदललेच नाहीत मंगळवारपर्यंत गुपचूप; बुधवारी खुलेआम पैशांचे वाटप

जळगाव : मनपा निवडणुकीत जामनेरप्रमाणे चमत्कार घडविण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळेच निवडणुकीवर देखरेखीसाठी असलेली यंत्रणा व पोलीस यंत्रणेने गैरप्रकारांकडे सोयीस्कर कानाडोळा केला. त्याचा गैरफायदा घेत उघडपणे मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आल्याचे प्रकार घडले.‘सेंट लॉरेन्स’मधील यंत्र बदललेच नाहीतमंगळवार, ३१ जुलै रोजी रात्री सेंट लॉरेन्स स्कूलमधील मतदान केंद्रातील मतदान कर्मचाºयांसाठी जेवण घेऊन भाजपा उमेदवाराची गाडी थेट मतदान केंद्राच्या आवारात शिरल्याचा प्रकार उघडकीस आला. याचवेळी एका कर्मचाºयाजवळ मतदान यंत्र उघडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने विरोधकांनी या मतदान केंद्रावरील कर्मचारी बदलण्यासोबतच मतदान यंत्रही बदलण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक यंत्रणेने केवळ कर्मचारी बदल करून विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पारदर्शक निवडणूक करण्याची भाषा करणाºया निवडणूक यंत्रणेने मतदान यंत्र कोणाच्या दबावाखाली बदलले नाही? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.मंगळवारपर्यंत गुपचूप; बुधवारी खुलेआम पैशांचे वाटपगेले दोन दिवस उमेदवारांकडून गुपचूप पैसे वाटप सुरू असल्याची चर्चा होती. तशा तक्रारीही आचारसंहिता कक्षाकडे येत होत्या. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगितले जात होते. मात्र मतदानाच्या दिवशी दुपारी अडीच-तीन वाजेपासून खुलेआम पैशांचे वाटप सुरू झाले. यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर होते. विरोधी उमेदवारांकडून तक्रार करूनही निवडणूक यंत्रणा व पोलिसांकडून केवळ तपासणीचा देखावा केला जात होता. उमेदवारांनी जेवढे प्रकार उघडकीस आणले तेवढेच पुढे आले. निवडणूक यंत्रणेने अथवा पोलिसांच्या पथकांनी स्वत:हून एकही कारवाई केल्याचे आढळून आले नाही. यावरून ही यंत्रणा राज्यातील सत्ताधाºयांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे स्पष्ट झाले.तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्षसेंट लॉरेन्स शाळेच्या मतदान केंद्र परिसरातच पैसे वाटपाचा प्रकार सुरू असल्याचे व्हीडीओ काढून एकाने पोलिसांना दाखवून दखल घेण्याची मागणी केली. मात्र पोलिसाने दुर्लक्ष करून संबंधीत तरूणाला टोलविले.भर रस्त्यावर नोटांचे बंडल वाटलेपैसे वाटपासाठी विश्वासू कार्यकर्त्यांना भर रस्त्यावर पैशांचे बंडल देऊन जबाबदारी सोपविण्याचा प्रकार वाघनगर रस्त्यावर घडला. एक उमेदवार भर रस्त्यावर समर्थकांसह उभा राहिला. तेथेच विश्वासू कार्यकर्त्याकडे असलेल्या बॅगमधून वाटपासाठी १००-५०० च्या नोटांचे बंडल काढून उमेदवाराने त्याच प्रभागात सोबत निवडणूक लढणाºया अन्य उमेदवाराच्या ताब्यात दिले. तर दोन बंडल अन्य विश्वासू कार्यकर्त्यांजवळ वाटपासाठी दिले. त्याचवेळी विरोधकांचे वाहन तेथे पोहाचताच कार्यकर्ते सटकण्याच्या तयारीत होते. मात्र उमेदवाराने घाबरू नका, उभे रहा असे सांगितल्याने ते जागेवरच थांबले. विरोधकांची गाडी तेथून निघून जाताच समोरून पोलिसांच्या दोन-तीन गाड्यात विरूद्ध दिशेने तेथे पोहोचल्या. त्यांनीही उमेदवाराशी गप्पा मारून पुढे प्रस्थान केले.घरांमधून पैसे वाटपम्युन्सीपल कॉलनी परिसरात व प्रभात चौक परिसरातूनही घरांमधून, कार्यालयांमधून पैशांचे वाटप सुरू होते. त्यामुळे पैसे घेण्यासाठी मतदारांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. पैसे दिल्यानंतर मतदान केंद्रापर्यंत मतदारांना घेऊन जाण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था केलेली असल्याचे दिसून आले.