चाळीसगावः गुजरदरी गावालगत रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी गस्त घालत असतांना वनहद्दीत चोरट्यांकडून सागवानी लाकूड हस्तगत करण्यात आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे मात्र पसार झाले. लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.गुजरदरी गावालगत जंगलात ३० रोजी दोन वनपरिक्षेत्र अधिकारी जंगल परिसरात रात्रीची गस्त घालत असतांना मोटारसायकलस्वार सागवानी लाकड्याच्या पाच दुसर व तीन दांड्या घेऊन जातांना आढळून आले. गस्तपथकाची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे लाकूड तेथेच टाकून पसार झाले. हस्तगत केलेल्या सागवानी लाकडाची किंमत १५ हजार रुपये असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपाल जी.एस.पिंजारी, आर. व्ही. चौरे, वनरक्षक वाय. के. देशमुख, एस.एच. जाधव, एस.बी.चव्हाण, आर.बी.पवार, आर.आर.पाटील, वनमजूर संजय देवरे, राहुल मांडोळे हे पथकात सहभागी होते. दरम्यान शितल नगराळे यांनी जंगल परिसरात गस्त वाढविल्याने चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.
गुजरदरीत तोडलेले सागवानी लाकूड केले हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 2:12 PM
वनपरिक्षेत्र अधिकारी जंगल परिसरात रात्रीची गस्त घालत असतांना मोटारसायकलस्वार सागवानी लाकड्याच्या पाच दुसर व तीन दांड्या घेऊन जातांना आढळून आले.
ठळक मुद्दे१५ हजाराचा मुद्देमाल हस्तगतगस्त पथकाची धडक कारवाईचोरट्यांच्या मुसक्या आवळणारः शितल नगराळेचोरटे पसारः चाळीसगाव वनविभागाची कारवाई