शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

जेवण करून परतताना कार झाडावर धडकली, एक ठार

By विजय.सैतवाल | Updated: July 14, 2024 23:30 IST

तिघेजण गंभीर जखमी : कारचा पुढील भाग चक्काचूर

जळगाव : शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलवरून जेवण करून घरी परतत असताना कारचा ताबा सुटून ती थेट झाडावर धडकल्याने आनंद शांताराम सोनवणे (वय ३९, रा. कासमवाडी) हे ठार झाले. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हा अपघात रविवारी (१४ जुलै) दुपारी ४:१५ वाजता जळगाव ते शिरसोली रस्त्यावरून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाला.

सामाजिक कार्यकर्ते असलेले आनंद सोनवणे हे रविवारी दुपारी त्यांचे मित्र भैरव उर्फ मुन्ना भगवान राणे (वय ३३), प्रवीण उर्फ पप्पू आढाव (वय ३५), योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५, सर्व रा. कासमवाडी) यांच्यासह कारने (क्र. एचएच १९, सीझेड १२१२) शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून घरी परतत असताना दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास त्यांची कार झाडावर धडकली. या भीषण अपघातात आनंद सोनवणे हे जागीच ठार झाले. तर उर्वरित तिघेजण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी कर्मचारी तसेच अपघातग्रस्तांचे मित्र, नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. चौघांना दुसऱ्या वाहनात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आनंद सोनवणे यांना मयत घोषित करण्यात आले. तर भैरव राणे, प्रवीण आढाव यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच योगेश रेंभोटकर यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करून त्यांनाही नंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

कारचा चक्काचूरकारची झाडाला धडक एवढी जोरात होती की, त्यात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. तसेच कारमधील कोणाला चेहरा, डोके, कानाजवळ व तोंडावर जबर मार लागला आहे. या अपघातात एकजण जागीच ठार होण्यासह अन्य तिघे बेशुद्ध झाले होते.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात