आॅनलाईन लोकमतकजगाव, ता. भडगाव : पाचोरा तालुक्यातील सार्वे येथील माहेर असलेल्या व सुरतमधील लिंबायत मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार संगीता पाटील यांचा सलग दुसºयांदा विजय झाला आहे. सलग दोन वेळा आमदार म्हणून विजयी झाल्याने सार्वेसह कजगांव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहेसूरत मधील लिंबायत विधानसभा मतदार संघातून पाचोरा तालुक्यातील सार्वे येथील माहेर असलेल्या संगीता पाटील यांनी भाजपाकडून निवडणूक लढविली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र पाटील यांना पराभूत केले. लिंबायत मतदार संघात तीनही उमेदवार हे मराठी होते. सलग दुसºयांदा आमदार म्हणून निवडून आल्याने कजगांव व परिसरात आनंद साजरा होत आहे. कजगांव येथे अनिस मणियार व भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.संगीता पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमीकजगाव येथून चार किलोमीटर अंतरावर व तितूर नदीच्या किनारी सार्वे या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात संगीता पाटील यांचा जन्म झाला आहे. त्यांना तीन बहिनी व दोन भाऊ आहेत. वडील डहाणू येथे पोलिस दलात कार्यरत होते. तर एक भाऊ ही पोलिस दलात तर दुसरा भाऊ व्यवसाय संभाळत आहे. संगीता पाटील या कुटुंबात सर्वात लहान आहेत.सार्वे येथील कन्या संगीता पाटील यांना मिळालेल्या यशाने गावाचा सन्मान वाढला आहे. या विजयामुळे सार्वे गावाचे नाव हे राज्यबाहेर गेल्याने आम्हाला आनंद होत आहे- शरद पाटील, सरपंच, सार्वे.संगीता पाटील यांना मिळालेल्या विजयाने परिसरात आनंद साजरा होत आहे. सार्वेची कन्या गुजरात मध्ये आमदार झाल्याने गावाचे नाव मोठे झाले आहे. त्यामुळे आम्हाला मनस्वी आनंद होत आहे- राजेश पाटील, काका
खान्देश कन्येच्या सुरतमधील विजयामुळे सार्वे गावात आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 6:17 PM
सुरत जिल्ह्यातील लिंबायत मतदार संघात भाजपाच्या उमेदवार संगीता पाटील यांचा विजय
ठळक मुद्देसंगीता पाटील यांना मिळालेल्या विजयाने परिसरात आनंदकाँग्रेसचे उमेदवार रवींद्र पाटील यांना केले पराभूत लिंबायत मतदार संघात तीनही उमेदवार हे मराठी